Trending

WPL Schedule : Womens Premier League India महिला प्रीमियर लीग 2024 संपूर्ण वेळापत्रक

WPL Schedule

WPL Schedule Womens Premier League भारत महिला प्रीमियर लीग २०२३ चा पहिला हंगाम यशस्वी पार पाडल्या नंतर आता बीसीसीआय दुसऱ्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तारीख सुद्धा जाहीर होऊन वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे. गेल्या वर्षी मुंबई मधील २ मैदानावर सामने पार पाडले गेले तर २०१४ या वर्षीचा सिझन हा दिल्ली आणि बेंगळुरू या दोन ठिकाणी सामने पार पाडण्यात येणार आहेत. महिला प्रीमियर लीग २०१४ चे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून यामध्ये पहिला सामना हा गतवर्षीच्या चॅम्पियन मुंबई इंडियन संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

WPL Schedule

महिला प्रीमियर लीग – Womens Premier League
महिला प्रीमियर लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, अंतिम सामना १७ मार्च रोजी होणार आहे. यंदाचे सर्व सामने नवी दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये खेळवले जाणार आहेत.

पहिला सामना : २३ फेब्रुवारी
अंतिम सामना (फायनल) : १७ मार्च ( ठिकाण : नवी दिल्ली)
सामन्यांचे ठिकाण : नवी दिल्ली आणि बेंगळुरू

या वर्षी महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण २२ सामने होणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील. अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

२०२३ फॉरमॅट प्रमाणे च २०२४ फॉरमॅटचा असेल, लीग स्टेजमधील टॉप तीन संघ प्लेऑफ मॅचसाठी पात्र ठरतील. लीग टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारे संघ एलिमिनेटर सामना दिल्ली येथे खेळतील.

२०२३ पहिला सिझन भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने जिंकला. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सिझन मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते व ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळवला होता.

Womens Premier League : WPL Schedule

डब्ल्यूपीएल २०२४ : पूर्ण वेळापत्रक

२३ फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू) MI Vs DC
२४ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स (बेंगळुरू) RCB Vs UPW
२५ फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (बेंगळुरू) GG Vs MI
२६ फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू) UPW Vs DC
२७ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स (बेंगळुरू) RCB Vs GG
२८ फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बेंगळुरू) MI Vs UPW
२९ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू) RCB Vs DC


१ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (बेंगळुरू) UPW Vs GG
२ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (बेंगळुरू) RCB Vs MI
३ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू) GG Vs DC
४ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (बेंगळुरू) UPW Vs RCB
५ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्ली) DC Vs MI
६ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (दिल्ली) GG Vs RCB
७ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्ली) UPW Vs MI
८ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्ली) DC Vs UPW
९ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली) MI Vs GG
१० मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (दिल्ली) DC Vs RCB
११ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्ली) GG Vs UPW
१२ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (दिल्ली) MI Vs RCB
१३ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली) DC Vs GG
१५ मार्च – एलिमिनेटर (दिल्ली)
१७ मार्च – फायनल (दिल्ली)

Women’s Premier League Auction

महिला प्रीमियर लीगच्या २०२४ दुसऱ्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव शनिवारी ९ डिसेंबर २०२३ ला मुंबई येथे पार पाडला होता. या लिलावात एकूण ५ संघानी बोली लावली व आपल्या पसंतीचे खेळाडू घेतले. या लिलावामधील टॉप ८ महागडे खेळाडू आपण पाहू : Women’s Premier League

१) अनाबेल सदरलँड (दिल्ली कॅपिटल्स) – २ कोटी रुपये

२) काशवी गौतम (गुजरात जायंट्स ) – २ कोटी रुपये

३) वृंदा दिनेश (यूपी वॉरियर्स ) – १.३ कोटी रुपये

४) शबनिम इस्माईल (मुंबई इंडियन्स) – १.२ कोटी रुपये

५) फोबी लिचफिल्ड (गुजरात जायंट्स) – १ कोटी रुपये

६) एकता बिश्त (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – ६० लाख रुपये

७) जॉर्जिया वेअरहॅम (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – ४० लाख रुपये

७) डॅनी व्याट (यूपी वॉरियर्सला) – ३० लाख रुपये

८) मेघना सिंग (गुजरात जायंट्स) – ३० लाख रुपये