Trending

WPL Match 2024 : दुसऱ्या सत्राला आजपासून म्हणजेच २३ फेब्रुवारी पासून होणार सुरुवात…..

WPL Match 2024


WPL Match 2024

WPL २०२४ : दुसऱ्या सत्राला (Season २) आजपासून म्हणजेच २३ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे

२०२४ या दुसऱ्या हंगामाचा पहिला हा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्या मध्ये होणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात भिडले होते. आणि मुंबई संघाने विजेतेपद पटकावले होते.

WPL Match 2024

WPL दुसऱ्या हंगामातील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स या दोन संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी बंगळुरू मधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

Womens Premier League २०२४ सर्व क्रिकेट चाहत्यांना आयपीएल २०२४ च्या आधी डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या सत्राला आजपासूनच म्हणजे २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. २०२४ मधील हा सीझन २४ दिवस रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ५ संघात एका ट्रॉफासाठी २ स्टेडियममध्ये २० सामने पार पडणार आहेत.

शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४ पासून Womens Premier League अर्थात डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या WPL स्पर्धेतील या सीझन मधील सर्व सामने हे नवी दिल्ली आणि बंगळुरु या दोन ठिकाणी पार पडणार आहेत.

Womens Premier League २०२४ मधील ५ संघाचं नेतृत्व करणारे ५ कॅप्टन :

१) हरमनप्रीत कौरमुंबई इंडियन्स
२) मेग लँनिंगदिल्ली कॅपिट्ल्स
३) स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
४) एलिसा हिली यूपी वॉरियर्स
५) बूथ मूनी गुजरात जायंट्स
WPL Team Captains

WPL Match Schedule : साखळी फेरी आणि प्लेऑफ
साखळी फेरीतील सामने हे २३ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान पार पडतील.
दुसऱ्या सीझन च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने येणार आहेत .
तर साखळी फेरीचा शेवटचा सामना हा १३ मार्च रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्या सामन्याने होईल.

WPL २०२३ फॉरमॅट प्रमाणे च WPL २०२४ फॉरमॅटचा असेल, यात लीग स्टेजमधील टॉप ३ संघ प्लेऑफ मॅचसाठी पात्र ठरतील. लीग टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारे संघ एलिमिनेटर सामना दिल्ली येथे खेळतील.

WPL Match

२३ फेब्रुवारी २०२४ पासून वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेला सुरुवात…….

WPL २०२४ सामने कुठे पाहता येणार ?
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर तसेच मोबाईलवर जिओ सिनेमा ऍप वर पाहता येतील.

दुसऱ्या मोसमातील पहिल्याच सामन्यात मुंबई विरुद्ध दिल्ली आमनेसामने :
या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी बेंगळुरू एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

या डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाबाबत आपण जाणून घेऊयात.
एकूण ५ संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी ८ सामने खेळणार आहेत.
१) मुंबई इंडियन्स
२) दिल्ली कॅपिट्ल्स
३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,
४) यूपी वॉरियर्सज
५) गुजरात जायंट्स
हे संघ आमनेसामने असणार आहेत.

    कोणत्या ठिकाणी खेळवले जाणार सामने ?
    नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे सर्व सामने पार पडतील.

    WPL Schedule : WPL Match
    महिला प्रीमियर लीग – Womens Premier League
    पहिला सामना : २३ फेब्रुवारी
    अंतिम सामना (फायनल) : १७ मार्च ( ठिकाण : नवी दिल्ली)
    सामन्यांचे ठिकाण : नवी दिल्ली आणि बेंगळुरू

    Womens Premier League लीगमध्ये एकूण २२ सामने होणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील. अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

    २०२३ चा पहिला सिझन भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स या संघाने जिंकला. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सिझन मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते व ट्रॉफी उंचावण्याचा मान हा मुंबई इंडियन्स ने मिळवला होता.

    WPL Match 2024