UPI News फ्रान्समध्येही झाली UPI ची सुरुवात…………
फ्रान्समध्येही झाली UPI ची सुरुवात….पॅरिसमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा करण्यात आली. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) औपचारिकपणे लाँच केले आहे. आता पर्यटक आणि लोक UPI द्वारे आयफेल टॉवरचे तिकीट काढू शकतील. फ्रान्सने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI वापरण्यास मान्यता दिली असून ती तेथे म्हणजेच फ्रान्स मध्ये सुरू करण्यात आली आहे.
पॅरिसमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ही घोषणा करण्यात आली. शुक्रवारी आयफेल टॉवर येथे त्याचे लाँचिंग करण्यात आले. आता फ्रान्सला जाणारे भारतीय आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी UPI वापरून ऑनलाइन तिकीट सहज खरेदी करू शकतील.
UPI News
भारताच्या पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया:
फ्रान्समध्ये UPI लाँच करण्यात आले यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. PM म्हणाले “हे पाहून खूप छान वाटले”. UPI जागतिक बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे डिजिटल पेमेंटला अधिकाधीक चालना मिळेल.
या केलेल्या लाँचनंतर, भारतीय पर्यटक UPI समर्थित ॲप्सद्वारे QR कोड स्कॅन फ्रान्स मध्ये करून सहजपणे पेमेंट करू शकतील. केवळ आयफेल टॉवरच नाही तर हॉटेल बुकिंग, संग्रहालयांना भेट देणे इत्यादी अनेक सेवांमध्येही ते उपयुक्त ठरेल असे म्हणण्यात आले आहे. या कार्यक्रमाला फ्रान्स आणि मोनॅकोमधील भारताचे राजदूत एम जावेद अश्रफ आणि लिराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
UPI म्हणजे काय?
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified payments interface) ही भारताची मोबाईल आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे. मोबाईल प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही एक संकल्पना आहे जी एका मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अनेक बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. UPI हे National Payments Corporation of India (NPCI) ने विकसित केले आहे.
NPCI ने २०१६ मध्ये देशात UPI प्रणाली आणली. PhonePe हे UPI ला त्याच्या सिस्टममध्ये आणणारे पहिले प्लॅटफॉर्म होते. एका वर्षानंतर ते जवळजवळ प्रत्येक पेमेंट सिस्टमशी जोडले गेले. यामध्ये एका बँक खात्यातून थेट दुसऱ्या बँक खात्यात सुलभ पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. UPI हे इतके लोकप्रिय झाले आहे की आता परदेशातही ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. UPI ने स्वतःला भारतातील अग्रगण्य पेमेंट पद्धत म्हणून स्थापित केले आहे.
UPI आजपर्यंत अनेक देशांमध्ये लागू आहे, भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, फ्रान्स यांसारख्या किमान १२ देशांमध्ये लागू आहे. या सुविधाचा फायदा प्रवासी भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना घेता येईल. भारताचा UPI स्वीकारणारा भूतान हा पहिला देश होता. जुलै २०२१ मध्ये, BHIM ॲपद्वारे UPI व्यवहारांना परवानगी देणारा भूतान हा पहिला देश ठरला. फ्रान्समध्ये UPI च्या स्वीकृतीमुळे फ्रान्स आणि युरोपमधील पर्यटन आणि किरकोळ क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन संधी खुल्या झाल्या आहेत.
UPI केव्हा लाँच झाला होता ?
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI २०१६ मध्ये लाँच झाला असून हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – National Payments Corporation of India ने तयार केले आहे. यामध्ये थेट एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात सुलभ पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
भविष्यामध्ये अजून काही देश या प्रणालीला मान्यता देऊन आपल्या देशामध्ये चालू करून घेतील व जागतिक स्तरावरचे व्यवहार सोपे होतील अशी आशा आहे.