UNION BANK RECRUITMENT PROJECT 2024-25 (SPECIALIST OFFICERS)
Union Bank of India ने विशेष विभागातील २१ विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोंदणी प्रक्रिया ०३/०२/२०२४ पासून सुरू झाली आहे. त्यासाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर भेट देऊन Union Bank of India भर्ती अर्ज सबमिट करू शकतात.
या सर्व पोस्टला अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२४ हि आहे.
एकूण पदे आणि रिक्त जागा तपशील
युनियन बँक एकूण रिक्त जागा: ६०६
भरण्यात येणारे पदे : १) सहाय्यक व्यवस्थापक
२) मुख्य व्यवस्थापक
३) वरिष्ठ व्यवस्थापक
४) व्यवस्थापक
हि पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज भरणे सुरु होण्याची तारीख : ०३ फेब्रुवारी २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २३ फेब्रुवारी २०२४
या भरतीमध्ये युनियन बँकेने या मोहिमेद्वारे संस्थेतील एकूण ६०६ रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Union Bank of India भर्ती २०२४ अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आवश्यकता जाणून घेतली पाहीजे.
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना खालील पात्रता योग्य असणे आवश्यक आहे:
१) B.Sc किंवा BE किंवा B.Tech पदवी संगणक विज्ञान किंवा संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यापीठ किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण झालेली असावी.
२) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोगांमध्ये पदव्युत्तर पदवी.
३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये M.Tech किंवा M.Sc.
४) पदवीमध्ये किमान ६०% गुण मिळालेले असावेत.
टिप : Detailed Educational Qualification साठी ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन जाहिरात पूर्ण वाचावी. काही पोस्ट साठी कामाचा अनुभव सुद्धा मागितला आहे.
UNION Bank Recruitment 2024
निवड प्रक्रिया कशी असणार :
युनियन बँक भरती निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत या ३ टप्पांचा समावेश होतो.
– मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांसाठीच्या होणाऱ्या परीक्षेत २०० गुणांचे १०० बहुपर्यायी प्रश्न असतील.
– तर दुसरीकडे, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठीच्या परीक्षेत २०० गुणांचे १५० बहुपर्यायी प्रश्न असतील.
परीक्षेचा एकूण कालावधी १२० मिनिटे आहे.
महत्वाचे : अजून संपूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.
ऑनलाइन परीक्षा आयोजित केल्यास तात्पुरते मार्च/एप्रिल 2024 मध्ये खालील केंद्रांवर आयोजित केली जाऊ शकते:
1) दिल्ली NCR
२) चंदीगड/मोहाली
३) लखनऊ
४) कोलकाता
५) पाटणा
६) भुवनेश्वर
७) हैदराबाद
८) बेंगळुरू
९) चेन्नई
१०) भोपाळ
११) मुंबई/नवी मुंबई/ग्रेटर मुंबई/ठाणे
१२) अहमदाबाद/गांधीनगर
Union Bank of India – Specialist Officers साठी अर्ज कसा करायचा ?
अर्ज करण्याच्या पायऱ्या – Union Bank ऑफ इंडिया Bharti साठी अर्ज कसा करायचा
युनियन बँक भर्ती २०२४ साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी या चरणांचे अनुसरण केले पाहिजे:
१) अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट द्या.
२) Recruitment टॅबवर जा.
३) ‘Union Bank Recruitment Project २०२४-२५ (Specialist Officers)’ या लिंकवर क्लिक करा.
४) आवश्यक तपशीलांसह स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
५) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
६) त्याची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ती तुमच्याकडे ठेवा.
महत्वाचे : अजून पूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.