Trending

UNESCO World Heritage sites in India Nomination युनेस्कोच्या World Heritage : २०२४-२५ युनेस्कोच्या World Heritage मान्यतेसाठी भारताने दिली १२ किल्ल्यांची नामांकन…

UNESCO World Heritage sites in India २०२४-२५

UNESCO World Heritage List: २०२४-२५ युनेस्कोच्या World Heritage मान्यतेसाठी भारताने दिले मराठ्यांच्या १२ मिलिटरी लँडस्केप्स किल्ल्यांची नामांकन

UNESCO World Heritage

२०२४-२५ या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा काळातील किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी भारत नामांकन देणार आहे असं सांगण्यात आलं आहे. हे किल्ले १७ ते १९ व्या शतकात बांधले गेलेले आहेत. १७ व्या आणि १९ व्या शतकात विकसित झालेल्या भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये, मराठा शासकांनी कल्पना केलेली एक विलक्षण तटबंदी आणि लष्करी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात.

World Heritage

UNESCO World Heritage २०२४-२५ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट (Unesco World Heritage List) साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश आपल्या देशातील नामांकनं पाठवत असतो. यंदा २०२४-२५ साठी भारताकडून युनेस्कोकडे मराठा स्वराज्यातील आणि रणभूमी मधील किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट २०२४-२५ करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा महाराष्ट्रातील मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. २०२४-२५ या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा स्वराज्य काळातील किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी भारत नामांकन देणार आहे. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले असून हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत.

युनेस्कोच्या या यादीत अगोदर भारतातील ४२ वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५ स्थळ आहेत आणि ते म्हणजे एलोरा लेणी, अजंठा लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स यांचा समावेश आहे

भारताकडून छत्रपती शिवरायांच्या कोणत्या गडकिल्ल्यांची शिफारस ?
युनेस्कोच्या World Heritage मान्यतेसाठी पाठवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील साल्होर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्गातील किल्ला आणि तामिळनाडूतील गिंगी किल्ला या १२ किल्ल्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील एकूण जवळपास ३९० आहेत त्यापैकी १२ मराठा काळातील किल्ले यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. १२ मधील आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित अगोदर केलेले आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि गिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर राहिलेले साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं संरक्षित केले आहेत. महाराष्ट्रात ३९० हून अधिक किल्ले आहेत.

२०२४-२५ या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारताचे “मराठा मिलिटरी लँडस्केप्स” हे नामांकन असणार आहे. या नामांकना मध्ये बारा घटक किल्ले आहेत. देशातील विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये वितरीत केलेले हे किल्ले मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तींचे प्रदर्शन करतात.

१७ व्या आणि १९ व्या शतकादरम्यान विकसित झालेल्या भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप्स, मराठा शासकांनी कल्पिलेल्या असाधारण तटबंदी आणि लष्करी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. किल्ल्यांचे हे विलक्षण जाळे, सह्याद्री पर्वत रांगा, कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण लँडस्केप, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये एकत्रित करण्याचा परिणाम आहे.

महाराष्ट्रा राज्यात ३९० पेक्षा जास्त किल्ले आहेत त्यापैकी फक्त १२ किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत निवडले आहेत, यापैकी आठ किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. हे शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि गिंगे किल्ला आहेत तर साल्हेर किल्ला, राजगड, खांदेरी किल्ला आणि प्रतापगड हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने संरक्षित केले आहेत.

भारतातील मराठा लष्करी भूदृश्यांमध्ये साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, राजगड आणि गिंगे किल्ले हे डोंगरी किल्ले आहेत तर प्रतापगड हा डोंगरी-जंगली किल्ला आहे, पन्हाळा हा डोंगरी-पठारीचा किल्ला आहे, विजयदुर्ग हा किनारी किल्ला आहे तर खांदेरी किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला हे बेट किल्ले आहेत. मराठा लष्करी विचारसरणीची सुरुवात १७ व्या शतकात मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत झाली. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचे महत्त्व वाढत गेले आणि विस्तार झपाट्याने होत गेला.

world heritage

UNESCO World Heritage sites in India

भारतात सध्याच्या घडीला ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी ३४ सांस्कृतिक स्थळे आहेत, ७ नैसर्गिक स्थळे आहेत तर १ मिश्र स्थळ आहे.
महाराष्ट्रात पाच जागतिक वारसा स्थळे आहेत…

१) अजिंठा लेणी (१९८३)
२) एलोरा लेणी (१९८३)
३) एलिफंटा लेणी (१९८७)
४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (२००४)
५) व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (२०१८)