Trending

T-20 World Cup Ticket Price : IND vs PAK Match विश्वचषकातील सामन्याची तिकिटे खूपच महाग…..

world cup ticket price

T20 विश्वचषकातील IND vs PAK सामन्याची तिकिटे इतक्या कोटींमध्ये विकली जात आहेत, तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. T-20 World Cup Ticket Price ? कधी होणार भारताचे सामने ?

IPL सामने झाल्यानंतर सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य हे यावर्षी होणाऱ्या ती T २० विश्वचषक स्पर्धेकडे लागणार आहे, या पार्शभूमीवरच एक बातमी आली आहे ती म्हणजे, IND vs PAK सामन्याची तिकिटे इतक्या कोटींमध्ये विकली जात आहेत….

T20 विश्वचषक 2024:
भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2024: क्रिकेट भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघांमध्ये क्रिकेट सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. बऱ्याच वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आता हे दोन संघ फक्त ICC टूर्नामेंट आणि आशिया कपमध्ये एकमेकांशी भिडताना दिसतात.

यावर्षी होणाऱ्या २०२४ च्या T-20 विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. T-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना १ जून २०२४ ला रंगणार असून फायनलचा सामना हा २९ जून २०२४ रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कच्या मैदानावर होणार आहे. मात्र याआधीच तिकिटाचे मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचे दर खूप महाग विकले जात आहेत.

किती आहे या तिकीटाची किंमत ?
T-२० विश्वचषक २०२४ साठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे StubHub आणि SeatGeek प्लॅटफॉर्मवर पुन्हा विकली जात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची किंमत १.८६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचे दर खूप महाग होत चालले आहेत.

World Cup Ticket Price

ICC च्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात तिकिटांच्या विक्रीदरम्यान, सर्वात कमी किंमत सुमारे ४९७ रुपये आणि सर्वोच्च किंमत ३३,१४८ रुपये होती. ही किंमत कर न ठेवता ठेवली होती. StubHub वरील भारत आणि पाकिस्तान सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट सध्या US$1,259 म्हणजेच १.०४ लाख रुपये आहे. SeatGeek सर्वात महागड्या तिकिटाची किंमत १ लाख ७५ हजार डॉलर आहे. $50,000 ची फी जोडून, ​​एकूण तिकीटाची किंमत $2 लाख 25 हजार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम अंदाजे 1.86 कोटी रुपये आहे.

कधी होणार भारताचे सामने ?
भारतीय संघ अ गटात असून त्याचे सामने पुढीलप्रमाणे :
T20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. यावेळी T20 विश्वचषकात २० संघ सहभागी होत आहेत. आणि Tournament मध्ये जवळपास ५५ सामने खेळवले जाणार. भारतीय संघाला अ गटात स्थान देण्यात आले आहे.

यात भारताव्यतिरिक्त आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक

५ जून – भारत वि. आयर्लंड, ठिकाण – न्यूयॉर्क
९ जून – भारत वि.पाकिस्तान, ठिकाण – न्यूयॉर्क
१२ जून – भारत वि. यूएसए, ठिकाण – न्यूयॉर्क
१५ जून – भारत वि.एस. कॅनडा, ठिकाण – फ्लोरिडा

World Cup Ticket Price