Indian Army SSC Technical Entry २०२४ : SSC Tech Entry इंजिनीरिंग पदवी धारकांना नोकरीची मोठी संधी भारतीय लष्करामध्ये ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची संधी…..
इंजिनीरिंग पदवीधारक असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी भारतीय लष्कराद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील ऑफिसर पदासाठी ३८१ पदं भरती काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ फेब्रुवारीपर्यंत २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांना देशसेवा करण्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे.त्यासाठी त्यांना अर्ज करून निवडप्रकिया पार करावी लागेल.
SSC Tech Entry
भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीप्रमाणे हि भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे, भारतीय सैन्यात इंजिनीरिंग पदवीधरांच्या ३८१ पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील इंजिनीरिंग पदवी आणि इतर विहित पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज यशश्वी भरल्यानंतर shortlisted उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखती ची तारीख व ठिकाण हे उमेदवारांना मेल द्वारे तसेच आपल्या लॉगिन द्वारे चेक करता येईल.
वयोमर्यादा : २०-२७ वर्षे (०२ ऑक्टोबर १९९७ आणि ०१ ऑक्टोबर २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवार)
महत्वाचे : अजून पूर्ण माहिती साठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.
शैक्षणिक पात्रता : इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २३ जानेवारी २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४
SSB मुलाखत तारीख : मे-जुलै २०२४ (अंदाजे )
गुणवत्ता यादी तारीख : ऑगस्ट – सप्टेंबर २०२४ (अंदाजे )
कोर्स सुरु होण्याची तारीख : ऑक्टोबर २०२४
SSC Tech Entry
निवडप्रकिया : भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती प्रक्रियेतील पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया असून शॉर्टलिस्टेड उमेदवारांना एसएसबी (SSB) मुलाखत व मुलाखत पास झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी (Medical Test ) आयोजित केली जाईल. एसएसबी मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या अंतिम यादीमध्ये क्रमानुसार (अभियांत्रिकी प्रवाहानुसार) उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येपर्यंत आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन असतील. त्या उमेदवारांना ४९ आठवड्यांच्या कालावधी साठी Officers Training Academy, Chennai (चेन्नई) येथे प्रशिक्षण दिल जाईल.
निवड प्रकियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रं :
१) आधार कार्ड
२) ऑनलाइन अर्ज प्रत
३) लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो
४) ई-मेल आयडी
५) मोबाईल नंबर
६) १० वी , १२ वी, मार्कशीट व प्रमाणपत्र
७) इंजिनीरिंग पदवी मार्कशीट व प्रमाणपत्र
या व्यतिरिक अजून काही कागदपत्रे आवश्यक असल्यास जाहिरातीमध्ये तसेच Call Up Letter सूचनेप्रमाणे चेक करावी .
अर्ज करण्याची प्रकिया कशी ?
१) अधिकृत वेबसाईटला www.joinindianarmy.nic.in भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
२) “Officer Entry Apply/Login” या टॅब वर क्लिक करा आणि नंतर “रेजिस्ट्रेशन ” वर क्लिक करा. यात आपली आवश्यक ती माहिती भरून घ्या.
३) रजिस्टर केल्यानंतर डॅशबोर्ड अंतर्गत “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा.
४) आता त्यानंतर “Short Service Commission Technical Course” कोर्समध्ये दाखवलेल्या “अर्ज करा” वर क्लिक करा.
५) अर्ज भरा आणि Sumbit करा.
या मोहिमेसाठी उमेदवार २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. याशिवाय, अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.
महत्वाचे : अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात संपूर्ण नीट काळजीपूर्वक वाचावी ज्याने करून अर्ज करताना काही चूक होणार नाही . आणि त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.
Update माहिती साठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट लिंकला भेट देत राहावी.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत करत असतात.भारत हे एक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी इंजि-नीरिंग विद्यार्थी घडवत असते.
SSC Tech Entry
तर ही इंजिनीरिंग पदवी उमेदवारांसाठी हि खूप मोठी सुवर्ण संधी आहे, असे आपण म्हणू शकतो.