“Sam Manekshaw”
भारत देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर प्रकाशित असलेल्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात ऍक्टर विकी कौशलने सॅम माणेकशॉ यांची भूमिका उत्तमरीत्या साकारली असून प्रेक्ष्यकांचा पसंतीत उतरली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला छान यश मिळाले होते. १ डिसेंबरला ‘सॅम बहादूर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे आता थिएटर स्क्रीन नंतर लवकरच ‘सॅम बहादूर’ चित्रपट OTT (Over the Top ) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Sam Manekshaw
“सॅम बहादूर” कोणत्या प्लॅटफॉर्म वर झाला प्रदर्शित ?
विकी कौशल ने मुख्य भूमिका साकारलेल्या ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट झी ५ (Zee ५) वर प्रदर्शित झाला आहे. त्याची माहिती लोकांना २२ जानेवारी ला झी ५ ने त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून दिली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी आहे असे म्हटले जात आहे….
दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी ‘सॅम बहादूर’ चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त अभिनेत्री सान्या मल्होत्रा, फातिमा सना यांना घेतले आहे . सान्या ही सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीच्या भूमिकेत असून, फातिमा यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाले, तर भारतात विकीच्या या चित्रपटाने १०० कोटींहून कमाई केली होती.
सॅम बहादूर यांच्याबद्दल थोडक्यात :
सॅम माणेकशॉ (बहादूर) यांच पूर्ण नाव “सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ” असं आहे. त्यांना आपण सॅम बहादूर या नावाने पण ओळखतो . त्यांचा जन्म हा ब्रिटिश काळातील पंजाब येथील अमृतसर मध्ये ३ एप्रिल १९१४ साली झाला होता. त्यांचा जन्म हा एका पारसी घराण्यात झाला. वडिलांचे नाव होर्मुसजी माणेकशॉ आणि आईचे नाव हिला माणेकशॉ असे होते.
१९३२ साली सॅम माणेकशॉ (बहादूर) यांनी इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून च्या पहिल्या बॅच मधून लष्करा मध्ये प्रवेश केला. त्यांना पुढे त्यांच्या करियर मध्ये वेगवेगळ्या पदावर बढती देण्यात आली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धात ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. आयुष्यातील चार दशकं त्यानी लष्करासाठी दिली आणि ते पाच युद्ध लढले. याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धात झाली होती. भारतातील ते पहिले सैन्य अधिकारी होते ज्यांना ‘फील्ड मार्शल’ हे पद मिळाले होते.
सॅम माणेकशॉ यांच लष्करी आयुष्य : Sam Manekshaw
दुसऱ्या महायुद्धात Burma येथे झालेल्या लढाईत ते गंभीर जखमी झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती हे पाहून त्यांना मिलिटरी क्रॉस हे गॅलँटरी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. १९४७ च्या भारताच्या फाळणी नंतर लष्कराची सुद्धा विभागणी झाली त्यावेळेस सॅम माणेकशॉ यांनी भारतीय लष्करासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांची नेमणूक आठव्या गोरखा रायफल्स मध्ये करण्यात आली. त्यांच्या लष्करी करियर मध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कंमान्डींग ऑफिसर म्हणून आपली कामगिरी बजावली व ते वेगवेगळ्या पदावर ते कार्यरत होते.
चीन आणि भारतात झालेल्या १९६२ सालच्या युद्धात आणि १९६५ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धात Sam Manekshaw यांनी केलेल्या नेतृत्वामुळे १९६९ मध्ये त्यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय लष्कर हे आधुनिक सैन्य म्हणून उदयास आले. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी खूप महत्वाचे धाडसी निर्णय घेतले होते. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. आणि पाकिस्तान ला शरण येण्यास भाग पाडलं. यामध्ये पाकिस्तानच्या जवळपास ९३,००० सैनिकांना शरण यावं लागलं होतं.
याचा परिणाम असा झाला कि डिसेंबर १९७१ ला पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र बांग्लादेश म्हणून तयार झाला. आणि ९३,००० सैनिकांनी एकाच वेळी शरण येणं ही जगाच्या पाठीवर घडलेली पहिलीच घटना होती. सॅम माणेकशॉ यांना या कामगिरीसाठी पद्मविभूषण हे पदक देण्यात आलं. जे भारतरत्न अवॉर्ड नंतर दुसरं सर्वात मोठ अवॉर्ड आहे. सॅम माणेकशॉ हे १९७३ मध्ये सेवानिवृत्त झाले. यावेळी ते फील्ड मार्शल या पदावर होते. फील्ड मार्शल हि एक फाइव स्टार रॅंक आहे. भारतीय लष्करामध्ये ही रॅंक मिळवणारे फक्त दोनच ऑफिसर झाले आहेत. २७ जून २००८ साली वयाच्या ९४ व्या वर्षी तामिळनाडू मधील वेलिंग्टन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
“सॅम बहादूर” हा चित्रपट भारताच्या पहिल्या फील्ड मार्शल म्हणजे सॅम माणेकशॉ जीवनावर आधारित आहे. त्यांची लष्करातील कारकीर्द हि जवळपास चार दशकांहून अधिक काळ आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल या फाईव्ह स्टार पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात विजयाचे नेतृत्व केले, ज्यामुळे बांगलादेश या देशाची निर्मिती झाली. “सॅम बहादूर” म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक चमकदार लष्करी धोरणांसाठी, त्यांच्या शौर्यासाठी आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ते आजही ओळखले जातात.