Ranji Trophy Final : Ranji Trophy Live रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीची श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. अंतिम सामन्यात मुंबईचा सामना विदर्भाशी होणार आहे. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना १० मार्चपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मुंबई क्रिकेट संघाने विक्रमी ४७ व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने सोमवारी उपांत्य फेरीत तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो शार्दुल ठाकूर ज्याने १०९ धावा केल्या आणि ४ बळी घेतले. मुंबई संघाने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा पराभव करून अंतिम फेरीत आधीच स्थान पक्के केले.
विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये विदर्भाने मध्य प्रदेशचा ६२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत मुंबई संघाचा सामना करण्याचा परवाना मिळवला आहे.
रणजी ट्रॉफी २०२४ : फायनल विदर्भ आणि मुंबई यांच्यात होणार आहे, रणजी ट्रॉफीच्या इतिहासात हे प्रथमच होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करत विदर्भाने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. आता अंतिम फेरीत फायनल चा सामना हा विदर्भ विरुद्ध मुंबई असा होणार आहे.
Ranji Trophy Final : Ranji Trophy Live
उपांत्य फेरीत तामिळनाडूचा पराभव करून मुंबई संघाने याआधीच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. विदर्भाने मध्य प्रदेशचा सेमी फायनल मध्ये ६२ धावांनी पराभव केला. विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश संघ हा रणजी ट्रॉफी २०२४ चा एक उपांत्य सामना होता, या सामन्यात विदर्भ संघाने मध्य प्रदेश संघाला विजयासाठी ३२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघ केवळ २५८ धावा करू शकला आणि सामना गमावला. यश राठोड विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने सहाव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या संघासाठी दुसऱ्या डावात १४१ धावांची शानदार खेळी केली.
विदर्भ आणि मुंबईत फायनल….. विदर्भ आणि मुंबई यांच्यातील ही जेतेपदाची लढत रणजी ट्रॉफीच्या इतिहासात कशी वेगळी असेल?
यावेळी रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा वेगळा असेल कारण पहिल्यांदाच विजेतेपदाचा सामना महाराष्ट्राच्या दोन संघांमध्ये होत आहे.
रणजी ट्रॉफी फायनल… काय आहे विदर्भ आणि मुंबईचं गणित आकडे काय सांगतात ?
यावेळी रणजी ट्रॉफीचा ८९ वा मोसम सुरू आहे. आतापर्यंत वानखेडे मैदानावर ११ वेळा रणजी ट्रॉफी फायनल झाली आहे. अर्थात, यंदा रणजीचा अंतिम सामना बाराव्यांदा वानखेडेवर होणार आहे. मुंबई हा रणजी ट्रॉफीचा सर्वात यशस्वी संघ आहे, जो आतापर्यंत ४१ वेळा चॅम्पियन बनला आहे.
विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी, त्यांच्या शेवटच्या दोन फायनलमध्ये म्हणजेच २०१७-१८ आणि २०१८-१९ यावर्षी त्याची विजयाची टक्केवारी १०० टक्के होती. म्हणजेच दोन्ही वेळा विजेतेपदावर कब्जा करण्यात तो यशस्वी झाला आहे. विदर्भ हा संघ तिसऱ्यांदा विजेतेपदाची मालिका तो कायम राखू शकतो की नाही हे पाहायचे आहे. एकूणच यावेळची रणजी ट्रॉफीची फायनल रंजक असणार आहे अस आपण म्हणू शकतो.
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाणार ?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना हा मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना केव्हा होणार ?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना १० मार्च २०२४ रविवार पासून खेळवण्यात येणार आहे.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आणि सामन्यांनंतर अखेर रणजी ट्रॉफी स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ या दोन महाराष्ट्रातील संघांमध्ये रणजी ट्रॉफीसाठीचा महाअंतिम म्हणजेच फायनल सामना होणार आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी महाअंतिम सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना रविवारी किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल.
Ranji Trophy Live
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल हा सामना टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना टीव्हीवर Sports18 Network चॅनेलवर पाहता येईल.
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना मोबाईलवर कोणत्या App वर बघायला मिळेल?
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल सामना मोबाईलवर Jio Cinema App वर बघता येईल.
मुंबई विरुद्ध विदर्भ फायनल हा सामना कधी आणि कुठे होणार?
रविवारी १० मार्चपासून फायनल हि मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई विदर्भा विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन अक्षय वाडकर याच्या खांद्यावर विदर्भाची मदार असणार आहे.आणि क्रिकेट रसिकही हि मॅच पाहण्यासाठी आतूर आहेत.
Ranji Trophy Live, Ranji Trophy Live