Rajkot Stadium : राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम (SCA) चे नाव बदलून निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम असे करण्यात आले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पाच कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटला गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. तर १४ फेब्रुवारी या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. सौराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांच्या सन्मानार्थ या स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आले. बुधवारी (१४ फेब्रुवारी) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने स्टेडियम च नाव बदलण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी सौराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांच्या नावावरून या स्टेडियमचे नाव निरंजन शाह स्टेडियम ( Niranjan Shah Stadium) असे ठेवण्यात आले आहे.
Rajkot Stadium : राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून केलं निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम….
निरंजन शाह ज्यांच्या नावावरुन राजकोट स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे
निरंजन शाह कोण आहेत ?
निरंजन शाह हे सौराष्ट्र संघाचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. निरंजन शाह यांनी १९६५ ते १९७५ साला दरम्यान १२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.त्यांचा जन्म हा ४ जून १९४४ रोजी राजकोट येथे झाला. त्यांनी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मॅनॅजमेन्ट मध्ये सचिवपदही सांभाळले आहे. ते बीसीसीआयचेही माजी सचिव राहिले आहेत. निरंजन शाह यांनी १९६५ ते १९७५ साला दरम्यान १२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्यांनी २८१ धावा केल्या होत्या. निरंजन शाह, ज्यांच्या नावावर स्टेडियमचे नाव बदलले गेले, ते बऱ्याच काळापासून क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत.
१९६५/६६ ते १९७४/७५ पर्यंतच्या कारकिर्दीत सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून, प्रशासकीय बाजूच्या बारकावे समजून घेण्याव्यतिरिक्त,ते खेळाडूंच्या मानसिकतेला देखील समजतात . सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Association) चे मानद सचिव असण्याव्यतिरिक्त, ज्या पदावर ते कार्यरत आहेत, त्यांना वेगवेगळ्या क्षमतेचा प्रशासकीय अनुभव आहे, ज्यामध्ये BCCI चे मानद सचिव असण्याचा समावेश आहे, ज्या पदावर त्यांची चार वेळा निवड झाली होती. ७९ वर्षीय हे पश्चिम विभागातील बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते आणि आयपीएलचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. शिवाय, त्याच्याकडे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचा भाग असण्यासारख्या जबाबदाऱ्या होत्या. सौराष्ट्र क्रिकेट प्रदेशातील बहुतेक यशाचे श्रेय प्रशासक म्हणून त्यांच्या दूरदृष्टीमुळे आहे आणि सौराष्ट्र क्रिकेटच्या प्रमुखपदावर त्यांच्यासोबत कसोटीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
कसा झाला कार्यक्रम ?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय ने “चकाकणाऱ्या” संध्याकाळची झलक शेअर केली ज्यामध्ये क्रिकेट स्टेडियम च्या नवीन नावाचे अनावरण करण्यात आले. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम ( Saurashtra Cricket Association Rajkot Stadium ) चे नाव बदलून निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम असे करण्यात आले आहे. भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Rajkot Stadium : १५ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरू होणार असल्याने, पूर्वसंध्येला एक समारंभ आयोजित करण्यात आला ज्यामध्ये स्टेडियमचे अधिकृतपणे नामकरण करण्यात आले. समारंभात सादर झालेल्या सुनील गावस्कर यांनी निरंजन शहा यांना दोन रणजी विजेतेपदे मिळवून देणाऱ्या सौराष्ट्राचे नशीब फिरवण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे श्रेय दिले. या नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची झलक दाखवणारा एक छोटासा व्हिडिओ बीसीसीआयनेही सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. या कार्यक्रमावेळी BCCI चे सचिव जय शाह यांनी यावर्षी येणाऱ्या टी -२० वर्ल्ड कप साठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांची निवड जाहीर केली. या कार्यक्रमासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा असे अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही उपस्थित होता.
या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह आणि भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर, त्यांच्याबरोबर भारताचे जेष्ठ माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी सौराष्ट्राचे खेळाडू चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा यांचाही सन्मान करण्यात आला. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि सुनील गावसकर यांनी सौराष्ट्राकडून नजीकच्या काळात मोठे यश मिळवणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान केला.
निरंजन शाह स्टेडियम : Rajkot Stadium
या स्टेडियममध्ये आजपर्यंत ११ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये २ कसोटी, ४ वनडे आणि ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत.
स्टेडियम मध्ये जवळपास २८,००० लोक बसतील एवढी कॅपॅसिटी आहे. निरंजन शाह स्टेडियम मधील मीडिया बॉक्स हे थोडेफार लॉर्ड्सच्या स्टेडियम च्या बॉक्ससारखा आहे.
Niranjan Shah Stadium Rajkot
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका आतापर्यंत १-१
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आघाडीची नोंद करण्यासाठी उतरतील. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा २८ धावांनी पराभव केला. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पुनरागमन करत इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. याकडे सर्व क्रिकेट प्रेमींच लक्ष असणार आहे.
Rajkot Stadium : राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून केलं निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम….