Indian Army SSC Technical Entry २०२४ : SSC Tech Entry इंजिनीरिंग पदवी धारकांना नोकरीची मोठी संधी भारतीय लष्करामध्ये ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची संधी….. इंजिनीरिंग पदवीधारक असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी भारतीय लष्कराद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील ऑफिसर पदासाठी ३८१ पदं भरती काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ फेब्रुवारीपर्यंत २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना देशसेवा करण्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे.त्यासाठी त्यांना अर्ज करून निवडप्रकिया पार करावी लागेल. SSC Tech Entry भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीप्रमाणे हि भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे, भारतीय सैन्यात इंजिनीरिंग पदवीधरांच्या ३८१ पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील इंजिनीरिंग पदवी आणि इतर विहित पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज यशश्वी भरल्यानंतर shortlisted उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखती ची तारीख व ठिकाण हे उमेदवारांना मेल द्वारे तसेच आपल्या लॉगिन द्वारे चेक करता येईल. वयोमर्यादा : २०-२७ वर्षे (०२ ऑक्टोबर १९९७ आणि ०१ ऑक्टोबर २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवार) महत्वाचे : अजून पूर्ण माहिती साठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत. शैक्षणिक पात्रता : इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २३ जानेवारी २०२४ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४ SSB मुलाखत तारीख : मे-जुलै २०२४ (अंदाजे ) गुणवत्ता यादी तारीख : ऑगस्ट – सप्टेंबर २०२४ (अंदाजे…