पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यात येणार असून त्यांच्या दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते २१. ८ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL-Mumbai Trans harbour Link) या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाचे उद्घाटन करतील, असे कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
Mumbai Trans Harbour Link
भारतातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे होणार उद्घाटन हे महाराष्ट्र त्याचबरोबर देशासाठी होणाऱ्या विकासकामाचं उत्तम उदाहरण आहे. पीएम मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची शुक्रवारी नाशिकपासून सुरुवात होणार असून ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान या भेटीदरम्यान काही विकासकामांची घोषणा करतील अशी शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी किती खर्च झाला ?
या प्रकल्पासाठी पूर्ण १८,००० कोटी खर्च झाला असून यात सहा लेन असलेल्या पुलाचा समावेश आहे. मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले यांना जोडणारे हा पूल असणार आहे.
कसं असणार आहे Mumbai Trans Harbour Link मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ?
हा पूल समुद्रावर १६.५ किमी लांबीचा आणि जमिनीवर सुमारे ५.५ किमी अंतराचा आहे. या प्रकल्पाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल त्याचबरोबर जेनपीटी बंदर, मुंबई ते पुणे, मुंबई ते गोवा या भारतातील प्रवासाचा वेळ देखील कमी करेल.
Mumbai Trans Harbour Link मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा वापर करण्यासाठी, वाहनचालकांना एकेरी प्रवासासाठी २५० रुपये आणि फेरीसाठी ३७५ रुपये टोल शुल्क भरावे लागेल.
याचा काय फायदा होईल ?
२०१८ पासून काम सुरु झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे मध्य मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ दोन तासांवरून २० मिनिटांपर्यंत कमी होईल, यामध्ये वेळेची बचत त्याचबरोबर इंधन बचत सुद्धा होणार आहे याचा चांगला परिमाण हा हवामानावर होईल. ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे जो मुंबईला मुंबई-गोवा महामार्ग, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांशी जोडेल.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू म्हणून ओळखले जाणारे Mumbai Trans Harbour Link मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबईतील शिवडी येथून उगम पावते आणि उरणमधील न्हावा शेवा येथे संपते.विश्लेषकांचे म्हणणे आहे की अटल सेतू हा नवी मुंबई च्या विकासामध्ये अजून भर पाडेल आणि महत्व वाढवेल.
९ नोव्हेंबर २०१७ रोजी, एम एम आर डी ए ( MMRDA ) ने लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि जपानच्या IHI कॉर्पोरेशन, देवू आणि टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड (TPL) च्या संघटित संघाला आणि L&T ला समुद्र सेतूच्या शिवडी बाजूचे बांधकाम करण्यासाठी कंत्राट दिले होते.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans harbour Link-MTHL) हा २१.८ किमी लांबीचा एक रस्ता पूल आहे जो भारतीय मुंबई शहराला नवी मुंबई या उपग्रह शहराशी जोडतो. हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरू होईल आणि एलिफंट बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडून न्हावा शेवाजवळील चिर्ले गावात संपेल.
२०१८ मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले. ४.५ वर्षांत तो लोकांसाठी खुला होणे अपेक्षित असताना, कोविड-19 च्या उद्रेकामुळे प्रकल्पाला आठ महिने उशीर झाला परंतु आता त्याच काम पूर्ण झाला असून तो लवकरच जनतेसाठी खुला होईल.