नुकताच चालू असलेला मालदीव आणि लक्ष्यद्वीप मधला तुलनेचा विषय तुम्ही ऐकलंच असेल याच पार्श्वभूमीवर आपण आज काही माहिती जाणून घेणार आहोत . आपल्या भारत देशाचे प्रंतप्रधान नुकतेच आपल्या लक्षद्वीप येथील बेटांवर जाऊन आले, पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा त्यांनी अनेक विकास योजनांचं उदघाटन केलं आहे. आणि लक्ष्यद्वीप वाद…..
Maldives आणि लक्ष्यद्वीप वाद…..
लक्षद्वीप दौऱ्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, आज सुरू झालेला ऑप्टिकल फायबर प्रकल्प लक्षद्वीप ला आधीच्या पटीने १०० पट वेगवान इंटरनेट स्पीड देईल.
त्यांच्याबरोबर त्यांनी लक्षद्वीपच्या “आश्चर्यकारक सौंदर्याचे” आणि समुद्रकिनाऱ्यावरील “शुद्ध आनंदाचे क्षण” ची अश्या शब्दांमध्ये प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की, भारतीय बेटे साहसींसाठी आवर्जून पाहण्यासारखी आहेत. यामागे लोकांनी जास्तीच जास्त याठिकाणी भेट दिली पाहिजे आणि पर्यटन केलं पाहिजे अशी आशा असावी. हे सगळं पाहून मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींवर आणि भारताबाबत आक्षेपार्ह विधानं केलं हे विधान करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केलं
मालदीव आणि लक्ष्यद्वीप वाद…..
मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर उत्तर म्हणून #boycottMaldives असं बोलून भारतीय नागरिकांनी तर विरोध केलाच पण मालदीवच्या काही राजकारण्यांनीदेखील या विधानांचा विरोध केला आहे. याचा परिणाम हा मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगावर होऊ शकतो असेही म्हटलं गेलंय. यामुळे त्यांच्या आर्थिक भागात तोटा निर्माण होऊ शकतो.
मालदीव मध्ये पर्यटनासाठी जगभरामधून खूप सारे लोक वर्षभर येत असतात इथे मुख्यतः सागरी पर्यटन जोरात चालते कारण इथले निळेशार समुद्र, सुंदर असे किनारे लोकांना भूरळ घालतात त्यामुळे पर्यटन हा मालदीव या देशाचा महत्त्वाचा भाग आहे आणि याच बरोबर पर्यटनामुळे या देशाच्या जीडीपी (GDP) मध्ये खूप फायदा होतो आणि त्यांचा महत्वाचा असा वाटा आहे. जवळपास २५ % पर्यंत योगदान हे फक्त पर्यटनातून येते.
मालदीव देशाबद्दल थोडक्यात माहिती :
माले हि मालदीव देशाची राजधानी आहे. मालदीव देशाची लोकसंख्या सुमारे पाच लाख आहे. आणि दुसरं म्हणजे मालदीवमध्ये दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक येतात जी कि खूप मोठी संख्या आहे. यामध्ये भारत, चीन, रशिया यासारख्या देशातून खूप सारे पर्यटक येतात. भारतातून मालदीव ला पोहचण्यासाठी विमान प्रवासाने २ तास लागतात. मालदीवमधली काही प्रेक्षणीय ठिकाणं आहेत त्यामध्ये सन आयलंड, आर्टिफिशियल बीच, फिहालाहोही आयलंड, माले शहर, मामीगिली, ग्लोइंग बीच हे प्रसिद्ध आहेत.
मालदीव हा १२०० बेटांचा समूह आहे. यातली बहुतेक बेटं निर्जन आहेत त्या बेटांचे एकूण मालदीवचं क्षेत्रफळ ३०० चौरस किलोमीटर आहे
१९६५ ला मालदीव स्वतंत्र झालं. ब्रिटिश पासून स्वतंत्र मिळाल्यानंतर काहीकाळ तिथे राजेशाही होती, पण नोव्हेंबर १९६८ मध्ये मालदीव प्रजासत्ताक देश बनला.मालदीवमधील ‘माल’ हा शब्द ‘माला’ या मल्याळम शब्दापासून या भाषेतून आला आहे. माल म्हणजे आपली “माळ” आणि दीव म्हणजे “बेट” . या दोन्ही शब्दांपासून मालदीव हा शब्द तयार झाला आहे .
भौगौलिक द्रुष्टया मालदीव भारताच्या नैऋत्येला आहे. भारतातील कोची पासून मालदीव सुमारे १००० किलोमीटरवर आहे. स्वतंत्र काळापासून भारताचे आणि मालदीवचे चांगले मैत्री संबंध राहिले आहेत आणि भारताने वेळोवेळी मालदीव ला मदतीचा हात पुढे केला आहे.
लक्ष्यद्वीप बद्दल थोडक्यात :
लक्षद्वीप हा आपल्या भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. ते केरळच्या कोचीपासून ४४० किलोमीटर अंतरावर बेटांच्या स्वरूपात बसले आहे आहे.लक्षद्वीप आणि मालदीव ७०० किलोमीटर अंतरावर आहे.
लोकजीवन
लक्षद्वीपमध्ये सुमारे ६४ हजार लोक राहत असून लक्षद्वीप हा ३६ लहान बेटांचा समूह आहे. त्यातील फक्त १० बेटांवर मानवी वस्ती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील ९६ टक्के लोकसंख्या मुस्लिम सामाज्याची आहे. लक्षद्वीपचे क्षेत्रफळ हे सुमारे ३२ चौरस किलोमीटर आहे. मासेमारी आणि नारळाची शेती करणे हे तेथील लोकांचे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. लक्ष्यद्वीप मध्ये कवरत्ती, अगत्ती, अमिनी,आणि मिनीकॉय अशी काही बेटांची नावे आहेत. लक्ष्यद्वीप मध्ये मुख्यत्वे मल्याळम भाषा बोलली जाते. फक्त मिनिकॉय बेटावर लोक माहे बोलतात. लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योगही झपाट्याने वाढला आहे.कोचीपासून लक्षद्वीपला जहाजाने १२ तासांत पोहोचता येतं. लक्षद्वीपमध्ये जाण्यासाठी विमानसेवा सुद्धा उपलब्ध आहे.
मालदीव आणि लक्ष्यद्वीप वाद…..
दोघांमधील तुम्हाला काही साम्य पाहायला मिळतील
१) चित्तथरारक समुद्रकिनारे: दोन्ही गंतव्ये हिंद महासागराच्या नीलमणी आलिंगनाने चुंबन घेतलेल्या पांढर्या वाळूसह मनमोहक किनारे आहेत. अंतहीन क्षितिजे हे एक खास आकर्षण आहे.
२) पाण्याखालील अद्भुत प्रदेश: मालदीव आणि लक्षद्वीप दोन्ही अतुलनीय स्नॉर्कलिंग आणि डायव्हिंग अनुभव देतात. सुंदर किरणांपासून ते स्फटिक- सागरी जीवसृष्टीने सजलेले दोलायमान कोरल रीफ एक्सप्लोर करता येते.
३) बेट हॉपिंग adventure : दोन्ही गंतव्ये बेट हॉपिंग टूर ऑफर करतात, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक बेटाचे अनोखे वैशिष्ट्य अनुभवता येते, गजबजलेल्या बाजारपेठांपासून ते आरामशीर जागा पाहायाला मिळते.
दोघांमधील तुम्हाला काही फरक पाहायला मिळतील :
१) लक्झरी आणि प्रामाणिकता : मालदीव त्याच्या आलिशान ओव्हरवॉटर बंगले आणि हाय-एंड रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे, जे पर्यटकांना आकर्षण पुरवते. दुसरीकडे, लक्षद्वीप अधिक शांत आणि अस्सल अनुभव देते, ज्यामध्ये सरकारी निवास व्यवस्था आणि बेटांचे नैसर्गिक सौंदर्य जतन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
२) सांस्कृतिक (Culture) : मालदीवमध्ये अरब, भारतीय आणि श्रीलंकन परंपरांचा प्रभाव असून विविध सांस्कृतिक मिश्रण आहे. लक्षद्वीपमध्ये एक भारतीय बेट असून तिथे मजबूत भारतीय वारसा आहे, जो त्याच्या पारंपारिक नृत्य प्रकार, संगीत आणि पाककृतीमध्ये प्रतिबिंबित होतो.
३) क्रियाकलाप : दोन्ही जागा कयाकिंग, पॅडलबोर्डिंग आणि स्नॉर्कलिंग सारख्या जलक्रीडा देतात. तथापि, मालदीवमध्ये सर्फिंग, विंडसर्फिंग आणि खोल समुद्रात diving यासारख्या साहसी क्रियाकलापांची विस्तृत श्रेणी असून मोठे प्रकार आढळतात. दुसरीकडे, लक्षद्वीप सांस्कृतिक आणि पर्यावरणास अनुकूल अनुभवांवर भर देते.
४) प्रवेशयोग्यता आणि खर्च: मालदीवमध्ये पोहोचणे सामान्यतः सोपे आहे, अनेक आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट वरून थेट उड्डाणे आहेत. लक्षद्वीपला परवानग्या आणि मर्यादित उड्डाण पर्यायांची आवश्यकता आहे, ज्यामुळे तो अधिक निर्जन आणि कमी खर्चिक पर्याय बनतो.