Iran Pakistan Border
जगात दोन ठिकाणी म्हणजेच युक्रेन विरुद्द रशिया आणि इस्राएल विरुद्ध हमास युद्ध परिस्थिती चालू असताना एक नवीन घटना काही दिवसात आपल्याला पाहायला मिळाली….. ती म्हणजे इराण आणि पाकिस्तान या शेजारी देशांबद्दल ची चाललेली ओढाताण…… १६ जानेवारीला इराण या देशाने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात दोन मुलं ठार झाली आहेत आणि तीन जण माणसं जखमी झाले आहेत असे पाकिस्तान कडून सांगण्यात येत आहे .
१७ तारखेला पाकिस्तानने हल्ल्याचा निषेध केला व इस्लामाबादने इराणवर पाकिस्तानी सेना हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा आरोप केला याचे उत्तर देताना इराण ने याबाबत स्पष्टीकरण देताना इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं की, “पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर आम्ही हा हल्ला केला नाही तर पाकिस्तानात राहून इराणमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्यांच्या दहशतवादी तळांवर आम्ही क्षेपणास्त्र डागली आहेत.”
यामध्ये हल्ल्यात “जैश-अल-अदल” या दहशतवादी संघटनेच्या तळांवर इराणने हल्ला केल्याचा दावा केला आहे .
Iran Pakistan Border
त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही १८ जानेवारीला इराणवर एक हल्ला केला. या दोन्ही घटनांमुळे इराण विरुद्ध पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली आहे.आणि आता या दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याच्या मार्गावर आहेत….
पार्शवभूमी : दोन्ही देशांमध्ये वर्षानुवर्षे हिंसाचाराच्या काही घटना घडत आलेल्या आहेत, ज्यामुळे या शेजारी देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत
डिसेंबर २०१० मध्ये चाबहारमधील मशिदीजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४१ जण ठार आणि ९० जण जखमी झाले होते. त्याचबरोबर २०१३, २०१४ या साली सुद्धा अतिरेकी हल्ले हे इराण वर झाले आहेत . २०१७, २०१८, २०१९ या वर्षा मध्ये सुद्धा दोन्ही देशामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतील. सुरुवातीला २०२३ पासून सुरु असलेले संघर्ष त्याचबरोबर डिसेंबर २०२३ मध्ये इराणने “दहशतवादी” गट म्हणून काळ्या यादीत टाकलेल्या जैश अल-अदल या संघटनेने सिस्तान-बलुचेस्तानच्या आग्नेय सीमावर्ती प्रांतातील रस्क या इराणी शहरात पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, ज्यात ११ इराणी ठार झाले.
Iran Pakistan Border
झालेले परिणाम व काय होऊ शकतं :
१) पाकिस्तानने इराणला व्यापारी चर्चेसाठी गेलेलं त्यांचं शिष्टमंडळ परत बोलवून घेतलं व निषेध नोंदवला.
२) पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका संबंधित वरिष्ठ अधिकार्याकडे निषेध नोंदवला.
३) इराणच्या हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून आता त्या भागातील विविध दहशतवादी संघटना अधिक सक्रिय होऊ शकतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.
४) पाकिस्तानने गुरुवारी १८ जानेवारी इराणच्या हद्दीत असणाऱ्या काही ठिकाणांवर हल्ले केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
५) इराण विरुद्ध पाकिस्तान संघर्षामुळे या भागाचा प्रादेशिक समतोल ढासळू शकतो. दोन्ही देशांमधील भू-राजकीय स्पर्धा, अंतर्गत संघर्ष आणि दहशतवादाच्या विरोधातील लढ्यामुळे परिस्थिती अधिक अवघड होऊ शकते.
पाकिस्तान च उत्तर :
याबाबत पाकिस्तानी ने म्हटलं कि “बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ आणि ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’ या दोन संघटनांच्या लपण्याच्या ठिकाणांवर आम्ही हे हल्ले केले आहेत . पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असे म्हणत पाकिस्तानी लष्कर यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. हि संपूर्ण कारवाई पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन ‘मर्ग-बार सर्मचार’ असं नाव असलेल्या ऑपेरेशन अंतर्गत केली आहे असेही म्हटलं आहे.
तणावाची काही कारणे :
१) इराण हे शिया मेजॉरिटी असलेले राष्ट्र आहे. इराण सरकारकडून सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांतात राहणाऱ्या सुन्नी अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केल्याची तक्रार वारंवार सुन्नी समुदाय करत असतो. याच असंतोषातून ‘जैश-उल-अदल’ ही एक संघटना तयार झालीआहे . इराणच्या सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांत आणि पाकिस्तानातचा बलुचिस्तान प्रांत सीमा लगत आहेत. या भागांमध्ये या संघटना कार्यरत आहेत.
२) इराण असे म्हणतो कि पाकिस्तानने याच भागात इराण सरकारविरोधात काम करणाऱ्या दहशतवादी गटांना वेळोवेळी आश्रय दिला आहे. त्यामुळे इराणने या आधीदेखील पाकिस्तानला लष्करी कारवाई करणाच्या इशारा दिलेला होता. पण याकडे लक्ष्य देण्यात आलं नाही असं इराण म्हणतो.
३) पाकिस्तानचे असे आरोप आहेत कि “गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी वंशाचे काही दहशतवादी इराणमध्ये राहून पाकिस्तानच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत होते. त्यावर आम्ही कारवाई केली आहे आणि पाकिस्तानी लष्कराने हे ऑपरेशन केले”.
दोन्ही देश हे आम्ही दहशतवादी कारवाई विरोधात आहोत असे भूमिका मांडत आहेत……… इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून येणाऱ्या काळात दोम्ही देश कशी भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष राहील .
Iran Pakistan Border इराण आणि पाकिस्तान तणाव
आंतरराष्ट्रीय पातळीवर मत:
भारत : हे दोन देशांमधील प्रकरण असलं तरी इराणने स्वरक्षणासाठी केलेली ही कारवाई आम्ही समजू शकतो, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालायने आपल्या नोट मध्ये म्हटलं आहे.
चीन : चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तणाव वाढवणाऱ्या कारवाया टाळायला हव्यात अशी प्रतिक्रिया दिलीय.