IND vs AUS Under – १९ वर्ल्ड कप २०२४ फायनल : भारत अगोदरच फायनल मध्ये पोहचला असताना आत्ता दुसऱ्या सेमी फायनल नंतर ऑस्ट्रेलिया ने सुद्धा आपलं फायनलच तिकीट बुक केलं आहे. पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल सामना अतिशय रंजक झाला. आत्ता १९ वर्षाखालील वर्ल्ड कप २०२४ चा फायनल सामना हा रविवार, ११ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदाचा सामना होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत हरलेल्या टीम इंडियाकडे १९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ ची अंतिम फेरी जिंकून कांगारूंकडून बदला घेण्याची चांगली संधी आहे. म्हणजेच १९ वर्षांखालील संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वरिष्ठ संघाचा बदला पूर्ण करू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता अंतिम सामना म्हणजेच विजेतेपदाची लढत होणार आहे.
शुक्रवार, १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघांनी भाग घेतला. अखेरीस या स्पर्धेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या रूपाने दोन अंतिम फेरीतील संघ मिळाले. रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे.
वन-डे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना अंडर – १९ विश्वचषक फायनल च सामना असणार आहे. आता या वेळी कोणता संघ विजेतेपद पटकावतो हे पाहणे क्रिकेट रसिक प्रेमासाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
६ फेब्रुवारी ला झालेल्या सेमीफायनल १ सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या सेमी – फायनल सामन्यात पराभूत केले. १९ वर्षांखालील विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मंगळवारी ६ फेब्रुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
त्यानंतर गुरुवारी या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झाला. दुसरा सेमीफायनल सामना अतिशय रोमांचक झाला, अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेतला सेमीफायनलचा दुसरा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर एक विकेटने विजय मिळवला. सेमीफायलनच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पहिली फलंदाजी दिली. पाकिस्तानने १७९ धावा केल्या. पण विजयाचं सोप वाटणार आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाचाही घाम निघाला. परंतु विजयी आव्हान पार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. पन्नासव्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावत ऑस्ट्रेलियाने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाच्या रफ मॅकमिलनने विजयी चौकार लगावला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केवळ १ गडी राखून पराभव केला. दोघांमधील हा लो स्कोअरचा सामना होता, ज्याचा थरार जास्त होता.
IND vs AUS U-19 Final
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता अंतिम सामना म्हणजेच विजेतेपदाची लढत होणार आहे…. अंडर – १९ विश्वचषक शुक्रवार, १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघांनी भाग घेतला. अखेरीस या स्पर्धेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या रूपाने दोन अंतिम फेरीतील संघ मिळाले. रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे.
उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, भारतीय संघ नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने एकूण पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.