Trending

क्रिकेट ICC Ranking : Test Bowler No.1 रविचंद्रन अश्विन….

क्रिकेट ICC Ranking

क्रिकेट ICC Ranking Bowler – रविचंद्रन अश्विन ने त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेतल्यामुळे अश्विनला गोलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान मिळू शकले आहे.

आयसीसीची ताजी क्रमवारी – इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाळा स्पर्धेत अश्विनने सर्वोत्तम कामगिरी केली अनुभवी बॉलर ने पहिल्या डावात चार बळी घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात पाच बळी घेत भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटीत वर्चस्व गाजवले.

क्रिकेट ICC Ranking

ख्राईस्टचर्चमधील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडसह दुसऱ्या स्थानावर आले आहेत. न्यूझीलंडचा मॅट हेन्री ६ स्थानांनी वर येऊन १२ व्या स्थानावर आहे अशाप्रकारे तो कारकिर्दीतील सर्वोत्तम गुणांवर पोहोचला आहे.

ICC Test Ranking Bowler- Top 5

Sr. No.BowlerRating
1रविचंद्रन अश्विन870
2जोश हेझलवूड847
3जसप्रीत बुमराह847
4कागिसो रबाडा834
5पॅट कमिन्स820
ICC Test Ranking Bowler

अश्विनचा सहकारी कुलदीप यादवने कारकिर्दीतील नवीन उच्च रेटिंग मिळवली आहे इंग्लंडविरुद्धच्या सात विकेट्स आणि सामनावीर ठरल्यानंतर त्याने १५ स्थानांची झेप घेतली आणि ८६८ रेटिंग सह एकूण १६व्या क्रमांकावर झेप घेतली.

त्याचबरोबर धर्मशालामध्ये शतके झळकावणाऱ्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत वर आले आहे. भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर परतला. रोहितने पाच स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल ने ही आठव्या स्थानावर पोहोचला आहे. धर्मशाला कसोटीत शानदार शतक झळकावणाऱ्या शुभमनने ११ स्थानांची झेप घेतली असून तो २१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. तर, इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानावर आहे. धर्मशाला येथे शतक झळकावणारा शर्मा पाच स्थानांनी वाढून सहाव्या स्थानावर आहे त्याचे रेटिंग ७५१ आहेत आणि या यादीमध्ये कसोटी फलंदाज केन विल्यमसन ८५९ रेटिंग सह पहिल्या क्रमांकावर आहे. यशस्वी जैस्वाल आठव्या स्थानावर आणि विराट कोहली ९ व्या स्थानावर आहे.

या अपडेट नंतर विराट कोहलीला एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या स्थानावर घसरला आहे. टीम इंडियाच्या सेटअपमधून बराच काळ बाहेर असलेला ऋषभ पंतही एक स्थान गमावून १५ व्या स्थानावर घसरला आहे.

कसोटी अष्टपैलू क्रमवारी – Test All-Rounder Ranking Mens

NumberBowlerRating
1रवींद्र जडेजा422
2रविचंद्रन अश्विन322
3शाकिब अल हसन320
4जो रूट282
5जेसन होल्डर270
Test All-Rounder Ranking Mens

भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या अद्ययावत यादीत टॉप वर आणि मागोमाग ३२२ रेटिंग सह अश्विन दुस-या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दोन स्थानांनी वर येत आठव्या स्थानावर आला आहे.

क्रिकेट ICC Ranking