Trending

How to reach Raigad Fort from Mumbai ?

Raigad Fort

Raigad Fort : रायगड  किल्ल्यावर कसे पोहचावे….?

नमस्कार मित्रांनो , आपण प्रवास या आपल्या भागात मराठी स्वराज्याची राजधानी आणि अतिशय महत्वाच्या अश्या आपल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत.रायगड किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यामध्ये वसलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक पवित्र ठिकाण आहे. या किल्याला अंदाजे १७३७ पायऱ्या असून रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे.

रायगड इतिहास थोडक्यात :
रायगड किल्ला हा पूर्वी रायरी या नावाने ओळखले जात होता. छत्रपती शिवरायांनी १६५६ साली हा किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याची पुनर्बांधणी केली व नंतर या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले. रायगड किल्ला बांधणीची जबाबदारी हि महाराज्यांनी हिरोजी इंदुलकर यांना दिली. हा रायगड किल्ला चारही बाजूंनी उंच मोठमोठ्या खडकांनी वेढलेला गेलेला आहे. त्यामुळे उंचावरून पाहिल्यास शत्रूवर दूरपर्यंत सहज नजर ठेवता येते व त्यामुळे रायगड त्याच्या सैन्याचे आणि प्रजेचे त्याच्या शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी उत्तम होता. रायगड किल्ल्यातील मुख्य दरवाजा आहे जो महादरवाजा म्हणून ओळखला जातो आणि ज्याचं वैशिष्ठ म्हणजे ते शत्रू ला सहज नजरेस पडायचा नाही. महादरवाजाला दोन उंच बुरुज असून ते खूप उंच आणि मजबूत आहेत.

Raigad Fort : रायगड  किल्याला कसे पोहचावे….?

मुंबई वरून कसे यावे :

१) एस टी बस : मुंबई वरून कोकणात (रत्नागिरी ,दापोली , खेड ,सिंधुदुर्ग) जाणाऱ्या आणि महाड मध्ये थांबा असणाऱ्या कोणत्याही बस ने तुम्ही महाड पर्यंत पोहचू शकता. तिथून रायगड किल्ला २५ किमी असून तुम्ही स्थानिक गावाला जाण्याऱ्या बस ने रायगड पायथा पर्यंत प्रवास करू शकता परंतु यात तुम्हाला कमी पर्याय मिळतील. त्यामुळे तुम्ही येथून रायगड ते महाड असणाऱ्या खाजगी वाहनाने शेरिंग करून जाऊ शकता

२) रेल्वे : मुंबई वरून एक्सप्रेस किंवा दिवा येथून पॅसेंजर ट्रेन पकडून तुम्ही माणगाव या रेल्वे स्टेशन ला उतरून नंतर महाड पर्यंत बसने पोहचू शकता. महाडवरून रायगड कडे स्थानिक गावाला जाण्याऱ्या बस ने रायगड पायथा पर्यंत प्रवास करू शकता. किंवा तुम्ही येथून रायगड ते महाड असणाऱ्या खाजगी वाहनाने शेरिंग करून जाऊ शकता.

३) खाजगी वाहन : खाजगी वाहन असल्यास तुम्ही डायरेक्ट रायगड किल्ला गाठू शकता या मध्ये तुम्हाला अजून एक पर्याय मिळतो तो म्हणजे तुम्ही माणगाव येथे आल्यावर ढालघर या फाट्यावरून थेट पाचाड येते पोहचून रायगड ला जाऊ शकता. Route साठी तुम्ही गूगल मॅप्स ची मदत घेऊ शकता.

पायथ्या पासून किल्ल्यावर जायला पायऱ्या आहेत तसेच रोप-वे सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

किल्ल्यावर पाहण्यासाठी महत्वाच्या जागा :

१) शिरकाई देवी मंदिर
२) गंगासागर तलाव
३) होळीचा माळ
४) राज्याभिषेक स्थळ
५) बाजारपेठ
६) शिवाजी महाराजांची समाधी
७) जगदीश्वर मंदिर
८) टकमक टोक
९) हिरकणी बुरुज
१०) टकमक टोक पॉइंट
११) हिरकणी बुरुज
१२) हत्ती तलाव
१३) महादरवाजा
१४) नगारखाना
१५) राजमाता जिजाऊ समाधी ( पाचाड)

Raigad Fort

Raigad Fort : रायगड  किल्ल्यावर कसे पोहचावे….?

रायगड हा किल्ला प्रथम १०३० मध्ये मौर्य राजा चंद्रराव मोरे यांनी त्याकाळी बांधला होता. राजे चंद्रराव मोरे यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी कमकुवत राज्यकर्त्यांची राजवट सुरू झाली, त्याचा परिणाम १६५६ च्या सुमारास मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि काही वर्षांसाठी ते आपले निवासस्थान बनवले. शिवाजी महाराजांनी त्यात काही सुधारणा आणि पुनर्बांधणी याची कामगिरी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली व ती त्यांनी चोखपणे पार पाडली. किल्याचे नाव बदलून रायगड ठेवण्यात आले. किल्ल्याचे स्थान, रचना आणि भौगौलिक स्थान पाहून त्याने १६७४ साली या किल्ल्याला आपल्या मराठा स्वराज्याची राजधानी केली. महाराज्यांचा राज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी पार पाडला. आजही रायगड किल्ल्यावर शिवजयंती आणि राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

Raigad Fort

Raigad Fort : रायगड किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ कोणती ?

हिवाळा – हिवाळा हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो, गुलाबी थंडी आणि धुकं यामध्ये किल्ला खूपच सुंदर दिसतो.
उन्हाळा – बरेच लोक उन्हाळा ऋतू सुद्धा निवडतात हा ऋतू सुद्धा चांगला मानला जातो. परंतु त्यावेळेस पाणी जास्त प्रमाणात सोबत घेऊन ट्रेक करावा.
पावसाळा – पावसाळा मध्ये एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळेल ,चहुबाजूनी हिरवगार वातावरण एकदम मनप्रसन्न करून टाकते आणि वर ट्रेक करत जाताना वरून वाहणारे झरे खूप छान दिसतात . मित्रांसोबत ट्रेक करण्यासाठी पावसाळा हा बेस्ट ऋतू राहील असं मला वाटत.

Raigad Fort : रायगड  किल्ल्यावर कसे पोहचावे….?

यावरून रायगड किल्ल्यावर भेट देण्यासाठी तिन्ही ऋतू हे सोयीस्कर आहेत असं आपण म्हणू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *