भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली!
Gautam Gambhir News –
Gautam Gambhir Quits Politics: आगामी लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या तयारीदरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. गौतम गंभीर यांनी भारतासाठी २००३ पासून २०१६ पर्यंत क्रिकेट खेळले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये, त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पूर्व दिल्लीतून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांनी २०२२ पर्यंत आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक म्हणून काम केले आणि आत्ता त्यांना २०२४ आयपीएलपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले.
शनिवारी सकाळी X अँप वर त्याच्या अधिकृत हँडलवर पोस्ट करत त्याने लिहिले कि, ‘मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन’. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी सन्माननीय पीएम नरेंद्र मोदी आणि सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!’
Gautam Gambhir News
गौतम गंभीर यांनी राजकारण सोडले – गौतम गंभीर हे दिल्लीच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. गंभीरने २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.
गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली या भागातून लोकसभा खासदार आहेत. यावेळी दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते, असे वृत्त आहे. ज्यामध्ये तरुण आणि महिलांचा सहभाग असू शकतो. अशा स्थितीत गंभीरचे तिकीटही रद्द होऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, भाजपने लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.
याबरोबरच आत्ता भाजपच्या लोकसभा यादीची प्रतीक्षा संपली आहे, शनिवारी संध्याकाळी १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये १९५ नावे जाहीर करण्यात आली. ३४ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट मिळाले आहे. ५० वर्षांखालील ४७ उमेदवार आहेत, ज्यांना पक्षाने तरुण म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणासीतून तर अमित शहा गांधीनगर मतदार संघातूनच लढणार आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज यांना विदिशा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना दिब्रुगडमधून आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांना त्रिपुरा पश्चिम आणि तिकीट मिळाले आहे.