Trending

Facebook Earn Money : Facebook वरून पैसे कमवायचे काही पर्याय

Facebook Earn Money

Facebook Earn Money…. फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे ?

१) Affiliate Marketing करून :
Facebook Earn MoneyAffiliate Marketing चे नाव ऐकताच एक गोष्ट नक्कीच आपल्या मनात येते ती म्हणजे Affiliate Marketing म्हणजे काय? आणि आपण एफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कसे कमवू शकतो का ? जेंव्हा तुम्ही तुमच्या Facebook ग्रुपमध्ये किंवा तुमच्या Facebook फॅन पेजवर इतर ब्रँड, उत्पादने, सेवा आणि वस्तूंचा प्रचार करता तेव्हा त्याला affiliate Marketing असे म्हणतात.


आजच जगात ई-कॉमर्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या प्रॉडक्ट साठी काही कंपनी affiliate Marketing चा पर्याय देखील बघतात. आजकाल बाजारात हजारो ब्रँड आणि कंपन्या आहेत ज्यांना जाहिरातींसाठी प्लॅटफॉर्म वापरायचा आहे. जसे की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि आणि अजून काही छोट्या मोठ्या कंपन्या. जर तुम्ही त्यांना त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी प्लॅटफॉर्म देऊ शकता, जसे की फेसबुक फॅन पेज, तर तुम्हाला कमिशन देखील मिळेल. तरीही तुम्ही प्रथम तुमच्या श्रोत्यांमध्ये विश्वास प्रस्थापित केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही Affiliate Marketing चा पर्याय वापरू शकता Affiliate Marketing मधून पैसे कमवू शकता.

Affiliate Marketing चे काही प्रोग्रॅम्स पण असतात ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही कंपन्याची उत्पादनाची जाहिरात तुमच्या Facebook पेजवर करू शकता, जसे तुम्ही YouTube आणि ब्लॉगद्वारे करता, जेणेकरून एखाद्याला तुम्ही Affiliate Marketing केलेलं उत्पादन आवडले तर तो ते उत्पादन विकत घेईल. आणि त्या बदल्यात कंपनी तुम्हाला जे कमिशन देईल.

२) फॅन्स आणि फॉलोवर्स साठी सर्व्हीस :
तुम्ही तुमच्या फेसबुक page वरून काही सर्विस देत असाल. जसे कि तुम्ही तुमच्या Facebook फॉलोअर्सना ऑनलाइन कोर्सेस, ई-बुक्स किंवा कोचिंग सेशन्स यासारखी सशुल्क उत्पादने किंवा सेवा देऊन पैसे कमवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या चाहत्यांकडून शाउटआउट्स, व्हिडिओ ग्रीटिंग्स यासाठी शुल्क आकारू शकता. तुमचे चाहते आणि अनुयायांकडून पैसे मिळवण्यासाठी तुम्ही मौल्यवान आणि संबंधित साहित्य तयार केले पाहिजे ज्यासाठी तुमचे प्रेक्षक पैसे देण्यास तयार आहेत.

त्यानंतर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर तुमच्या सेवा तुन तुमच्या फॉलोअर्ससाठी मार्केट करू शकता. अनुकूल सामग्री प्रदान करण्यासाठी तुम्ही Facebook च्या क्रिएटर स्टुडिओचा वापर करून तुमची सामग्री तयार आणि व्यवस्थापित करू शकता.

३) Social Media Manager बनून:
फेसबुकवर तुम्हाला अनेक Facebook Group दिसतील. त्यांचे सदस्य हे जवळपास लाखोंपर्यंत पर्यंत आहेत. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, Celebrity आणि ऐतिहासिक ग्रुप दिसतील. मोठ्या संस्था, राजकीय पक्ष आणि छोट्या पासून मोठ्या सर्व कंपन्या ह्या त्यांच्या प्रचारासाठी अशा ग्रुपचा वापर करत असतात.

लोकांना जोडण्यासाठी व पेज चालवण्यासाठी Social media manager म्हणून अनेक तरुणांना पगारी काम दिले जाते. तर अनेक ग्रुप हे वैयक्तिक चालविले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण Social media manager बनून पैसे कमवू शकत आहेत. काही पर्सनल ग्रुप असतात किंवा मोठे brands असतात त्यांना facebook वर आपले पेज चालवण्यासाठी strategy माहिती असलेले लोक पाहिजे असतात. त्याना पूर्ण strategy माहिती झाली असते त्यामुळे अश्या लोकांची गरज मोठे Personal account जसे नेते, celebrity किंवा मोठे brands यांचे account manage करत असतात.

४) Sell own products – स्वतःचे प्रॉडक्ट विकणे :
Sell your own products हा एक marketing करतात त्यातीलच एक प्रकार आहे. फक्त आपण दुसऱ्यांचे product promote न करता आपले products promote करतो त्यामुळे आपला डबल फायदा असतो. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कमाई करण्यासाठी आपलं ब्रँड प्रमोशन हा एक चांगला पर्याय आहे. जेव्हा तुम्ही तुमचे Facebook खाते एका विशिष्ट श्रेणीमध्ये वाढवता, आणि तुमचं कस्टमर वाढवून तुम्ही आणि त्या बदल्यात चांगले पैसे मिळवू शकता.

Facebook Earn Money

५) Facebook group मधून :
आपण समजा एक Facebook group बनवले आणि तिथे जास्तीत जास्त लोक जर त्या group मध्ये add झाले म्हणजेच यासाठी तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगला प्रेक्षक असणे खूप महत्वाचे आहे, त्या group मध्ये आपण ग्रुप admin असतो आणि आपण तो हॅन्डल करत असतो. आपल्या हातात सर्व settings असतात.

त्यामधील एक सेटिंग म्हणजे admin only ज्या आपण केल्या म्हणजे group मध्ये admin शिवाय कोणीच message टाकू शकत नाही. तर यामध्ये ज्या लोकांना आपलं content जास्तीत लोकांपर्यंत पोहचवायचं आहे अश्या लोकांकडून तुम्ही पैसे आकारून त्यांची पोस्ट तुमच्या ग्रुप मध्ये टाकू शकता त्यानंतर तुम्ही टाकलेल्या पोस्टच दिसतील. याला आपण Paid Post म्हणू शकतो. हा सुद्धा एक फेसबुक वरून पैसे कमावण्याचा चांगला पर्याय आहे.

Facebook Earn Money