BCCI Central Contracts : Board Of Cricket Control India खेळाडूंची निवड? BCCI Contract List
BCCI Central Contracts: A+, A, B, C करार
BCCI Central Contracts : नुकताच भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) वार्षिक करार जाहीर केला आहे . ज्यामध्ये Ishan Kishan आणि Shreyas Iyer यांची नावे दिसत नाही. हे २ खेळाडू गेल्या वर्षी कराराचा भाग होते. मात्र यावेळी संघ व्यवस्थापनाच्या नाराजीमुळे त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. अशी चर्चा आहे.
या करारामध्ये जवळपास एकूण ३० खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागून करार मिळाला आहे. आणि बीसीसीआयने याचवेळेस पाचवी विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या पाचव्या श्रेणी मध्ये फक्त वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. या यादीत पाच फक्त युवा वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. BCCI Contract List
Board Of Cricket Control India BCCI खेळाडूंची निवड कश्याप्रकारे करते ?
तर यामध्ये भविष्यातील योजना कश्या असणार, खेळाडूंची कामगिरी आणि फॉर्म हे सगळं लक्षात घेऊन BCCI केंद्रीय करारत कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीमध्ये टाकायचं हे ठरवते.
यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना A+ श्रेणीत कायम ठेवण्यात आले. यांच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हे देखील A+ श्रेणीत आहेत.
BCCI कोणत्या आधारावर A+, A, B आणि C सारख्या श्रेणींमध्ये खेळाडूंची निवड केली जाते आणि त्यांना किती पैसे मिळतात….? कोणत्या श्रेणीतील खेळाडूला किती रुपये मिळतात ?
A+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी रुपये,
A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये,
B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि
C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक १ कोटी रुपये मिळतील.
BCCI Contract List
Grade A+ : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.
Grade A : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, KL राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या. (A श्रेणीतील या खेळाडूंना पाच कोटी मिळतील.)
Grade B : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल. (B श्रेणीतील या खेळाडूंना तीन कोटी मिळतील.)
Grade C : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेशकुमार, संजू सॅमसन, अर्शदीप, के. एस. भारत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार. ( या श्रेणीतील सर्व खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपये मिळतील.)
Fast Bowling Contract : उमरान मलिक, आकाश दीप, यश दयाल , विद्वत कवेरप्पा.
Board Of Cricket Control India ने (BCCI) आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केलेला आहे. BCCI ने यात ३० क्रिकेटपटूंना त्यांचा वार्षिक केंद्रीय करार दिला आहे. या क्रिकेटपटूंना २०२३-२४ हंगामासाठी हा करार मिळाला आहे. टीम इंडियाच्या या सर्व खेळाडूंची ए +, ए, बी आणि सी (A+, A, B, C) अशा ४ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या ३० नावांव्यतिरिक्त ५ खेळाडूंनाही स्पेशल करार मिळाले आहेत.
बीसीसीआयने यावेळेस म्हटले आहे की, टीम इंडियाच्या निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या कराराची शिफारस केली होती आणि त्यामुळे त्याकडून यात ५ विशेष नावांचा समावेश करण्यात आला आहे.
१) उमरान मलिक
२०२२ हा इंडियन टीम मध्ये debut करणारा उमरान मलिक हा आजच्या घडीला भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याने ताशी १५५ kmph पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकला आहे. मात्र, उमरान सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. तो IPL मध्ये Sunrisers हैदराबाद या टीम कडून खेळतो.
२) विद्वत कवेरप्पा –
२५ वर्षीय विद्वत कवेरप्पा कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. Ranji Trophy च्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने १० विकेट घेतल्या आहेत. विद्वत कवेरप्पा ने आतापर्यंत २० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८० विकेट आहेत. यासह त्याने १८ लिस्ट ए सामन्यात ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
३) आकाश दीप –
भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने सध्याच इंग्लंड विरुद्धच्या रांची कसोटीत आपले पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये नवीन चेंडूवर ३ बळी घेतले आणि आपली क्षमता दाखवून दिली. आकाशला वेगवान गोलंदाजीचा स्पेशल करार मिळाला आहे. २७ वर्षीय बिहारचा आकाश बंगालकडून Domestic क्रिकेट खेळतो तर IPL मध्ये तो Royal Challengers Banglore संघाकडून खेळतो.
३) यश दयाल –
Uttar Pradesh चा वेगवान गोलंदाज यश दयाल यालाही वेगवान गोलंदाजीचा स्पेशल करार मिळाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज दयालने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्याच्या नावावर ७२ बळी आहेत. यावर्षी IPL मध्ये Royal Challengers Banglore या संघाने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
४) विजयकुमार वैशाख –
कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाखचाही बीसीसीआयने वेगवान गोलंदाजीच्या करारात समावेश केला आहे. त्याने आतापर्यंत २० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८६ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.
BCCI Contract List 2024