Trending

WPL Match : महिला प्रीमियर लीग 2024 प्लेऑफ MI Vs RCB Eliminator

WPL Match

WPL Match : MI vs RCB WPL Eliminator Live महिला प्रीमियर लीग २०२४ च्या प्लेऑफ फेरीला आजपासून म्हणजेच १५ मार्चपासून सुरुवात होत आहे. WPL महिलांच्या प्लेऑफमध्ये केवळ दोन सामने खेळले जातात आणि दोन्ही बाद फेरीचे सामने आहेत. आज पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. विजयी संघ १७ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत संघ बाद होऊन या लीग मधील त्या संघाचा प्रवास इथेच संपेल.

WPL Match : MI vs RCB WPL Eliminator

दिल्ली कॅपिटल्सने या सिझन मध्ये आपल्या खेळाच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश केलाआहे. भारतीय कॅप्टन अनुभवी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर होता, तर स्मृती मानधना नेतृत्व करत असलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर होता.

यापूर्वी वुमन्स प्रीमियर लीगच्या शेवटच्या मोसमात मुंबईने जेतेपद पटकावले होते, ते पहिलेच हंगाम होते. आणि त्याला क्रिकेट प्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.

या सिझन मध्ये प्लेऑफमध्ये भारतीय कर्णधारांचे वर्चस्व आहे असं आपल्याला म्हणता येईल….
यावेळी, महिला प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या तीन संघांपैकी दोन संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे, तर एका संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन मेग लॅनिंगकडे आहे. मात्र, गेल्या वर्षी तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या तीनपैकी दोन संघांचे कर्णधार ऑस्ट्रेलियाचे होते. गेल्या वर्षी, दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त, तिसरा संघ यूपी वॉरियर्स होता, ज्याची कर्णधार एलिसा हिली आहे.

मुंबई इंडियन्स संघ पुढे असलेली आव्हाने
एलिस पेरीच्या घातक गोलंदाजी चा मुंबई ला सामना करावा लागेल, कारण नुकताच झालेल्या दोन्ही संघातील सामन्यांमध्ये एलिस पेरी ने उत्तम कामगिरी केली होती. एलिमिनेटरमध्ये मुंबईला पेरीबरोबरच जबरदस्त फॉर्म मध्ये असलेल्या स्म्रिती मानधना आणि रिचा घोषलाही सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई विरुद्ध बंगलोर आकडेवारी : WPL Match : MI vs RCB WPL
मुंबई विरुद्ध बंगलोर मध्ये बोलायचे झाले तर या दोन संघांमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने तीन सामने जिंकले असून बेंगळुरूने केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र, मंधानाच्या संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे गेल्या सामन्यातच हा विजय मिळाला. एलिमिनेटर चा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १५ तारखेला होणार आहे.

या मोसमात असे दिसून आले आहे की नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे आणि एलिमिनेटरमध्येही हाच कल कायम राहू शकतो.

यास्तिका भाटिया परत येऊ शकते का ?
गेल्या सामन्यात मुंबई संघाला यास्तिका भाटियाची उणीव भासली होती. एलिमिनेटर सामन्यात ती पुनरागमन करू शकते. गेल्या सामन्यात यास्तिका भाटिया संघाबाहेर असल्यामुळे सजीवन सजनाने हेली मॅथ्यूजसोबत सलामी दिली होती. यास्तिकच्या पुनरागमनामुळे सजनाला फलंदाजीची क्रमवारी खाली पाठवली जाईल. त्याचबरोबर यस्तिकाच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंग करणाऱ्या प्रियांका बालाला वगळले जाऊ शकते. हाच बदल संघात पाहायला मिळू शकतो.

WPL Match : MI vs RCB WPL

काही उल्लेखनीय कामगिरी :
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी मुंबईची अमेलिया कार दोन सामन्यांमध्ये सामनावीर ठरली आहे. त्याच वेळी, RCB ची एलिस पेरी महिला प्रीमियर लीगमध्ये ५०० धावांपासून फक्त एक धाव दूर आहे.

ॲलिस पेरी विक्रम करण्याच्या जवळ
आरसीबीची ऑल राउंडर एलिस पेरी महिला प्रीमियर लीगमध्ये ५०० धावांपासून फक्त एक धाव दूर आहे. एक धाव घेऊन, ती महिला प्रीमियरमध्ये ५०० धावा पूर्ण करणारी चौथी फलंदाज ठरेल. तिच्या आधी मेग लॅनिंग, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांनी ही कामगिरी केली होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, WPL २०२४ एलिमिनेटर कोणत्या तारखेला खेळला जाईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील एलिमिनेटर सामना शुक्रवार, १५ मार्च २०२४ रोजी होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, WPL २०२४ एलिमिनेटर किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स , WPL २०२४ एलिमिनेटर कुठे खेळला जाईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, WPL २०२४ एलिमिनेटर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कसे पाहायचे?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना भारतात JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

WPL Match : MI vs RCB WPL Eliminator