Underwater Metro Kolkata – India’s First Under River Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. याचवेळेस पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे त्यांनी १५,४०० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी सहा नवीन मेट्रो ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. त्यात भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे. हा मेट्रो बोगदा कोलकात्याच्या हुगळी नदीखाली बांधण्यात आला आहे. जे हावडा मैदानाला एस्प्लेनेडशी जोडते. यासोबतच पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत कोलकाता मेट्रोमध्ये प्रवासही केला.
पंतप्रधान मोदींनी कोलकाता येथे भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले ?
PM नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, ६ मार्च २०२४ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे देशातील पहिल्या नदीखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन केले आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोलकाता येथे अंडरवॉटर मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. हा प्रकल्प हावडा मैदान ते एस्प्लेनेड दरम्यान सुरू झाला आहे. आणि हा देशातील अश्या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी पाण्याखालील मेट्रो रेल्वेची सफरही केली. पाण्याखालील मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग आहे. कोलकात्यात या कॉरिडॉरचे काम २००९ मध्ये सुरू झाले होते. भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सेवा लोकांसाठी लवकरच सुरू होणार आहे.
पाण्याखालील मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहेत. तिकिटाचे दर ५ ते ५० रुपयांपर्यंत असतील असे म्हटले जात आहे. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत हावडा मैदान मेट्रो स्टेशन हुगळी नदीखाली बांधण्यात आले आहे. स्टेशनच्या पृष्ठभागापासून ३३ मीटर खाली बांधलेले हावडा मैदान हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. देशातील पहिल्या नदीखालील मेट्रो बोगद्याच्या (अंडरवॉटर मेट्रो मार्ग) उद्घाटनापूर्वी, शालेय विद्यार्थ्यांनी भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेत पंतप्रधान मोदींसोबत प्रवास केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हावडा मैदान-एस्प्लेनेड विभाग हुगळी नदीच्या खाली जातो. ज्यांच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर कोलकाता आणि हावडा ही शहरे वसलेली आहेत. सुरु झालेली मेट्रो हुगळी नदीखालील ५२० मीटरचे अंतरअवघ्या ४५ सेकंदात पार करेल असा अंदाज आहे.
Underwater Metro Kolkata
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अजून काही प्रकल्पांची यादीः
PM नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागाचे उद्घाटन केले. पाण्याखालील मेट्रो सेवा देणारा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड सेक्शनचे आज उद्घाटन करण्यात आले, परंतु काही वेळाने ते प्रवाशांसाठी खुले केले जाईल. अंडरवॉटर मेट्रो मार्गासह, पंतप्रधान मोदींनी कवी सुभाष-हेमंत मुखोपाध्याय आणि तरातला-माजेरहाट मेट्रो विभागांसह इतर रेल्वे सेवांनाही हिरवा झेंडा दाखवला.
पुणे मेट्रोचं पण केलं उदघाट्न
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंतच्या पुणे मेट्रोचेही पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले आहे या महाराष्ट्रातील प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांनी सुरुवात केली. याचवेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोलाही PM नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
Underwater Metro Kolkata, Underwater Metro Kolkata, India’s First Under River Metro